पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत. ...
पाण्याने भरलेल्या कॅन. कुणीही यावे आणि उचलून रोपांच्या आळ्यात पाणी घालावे. त्या पुन्हा पुन्हा भरले जाणे नि पुन्हा पुन्हा रिते होणे. सारे केवळ झाडांसाठी. भानखेडा मार्गावरील चार किमी रस्त्याच्या दुतर्फा रोपे याच तऱ्हेने जगविली जात आहेत. ...
काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे. ...
सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत. ...
भरधाव कार पुलावरून कोसळून जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बहिरमनजीक सायखेड येथे घडली. ते चिखलदरा तालुक्यातील कोटमी ेयेथील शाळेत कार्यरत आहेत. ...
शिवाजी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांसह युवकांनी प्राचार्यांना मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. गाडगेनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह एकूण सहा युवकांविरुद्ध गुन्हा नोंद ...
उपेक्षित, वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेले आरक्षण सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत देशात कागदावर ७८ टक्क््यांपर्यंत, तर प्रत्यक्षात ९५ टक्क््यांवर पोहचवले आहे. या मुद्द्यावर अतिआरक्षण विरोधी एकता मंच एकवटला आहे. ...
शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्या ...