साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला. ...
तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते. ...
उन्हाळा लागताच जिल्हाभरात महिलांना कुरड्या, पापड, शेवळ्या आदी पदार्थ साठविण्याचे वेध लागतात, तर मेळघाटात आबालवृद्ध जवळपास दोन महिने जंगलातील मोहफुले, हिरडा, चारोळी आदी रानमेवा वेचून, तोडून, वाळवून रोजगारनिर्मिती करीत असतात. ...
शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. ...
योग्य काम नाही म्हणून हातावर हात देऊन बसणारे बेरोजगार आढळतात. मात्र, माधुरी ऊर्फ मधू रामलाल कुमरे (१९) हिने वृत्तपत्र वाटप करून कुटुंबाला हातभार लावते. शहरातील वृत्तपत्र व्यवसायातील मधू ही पहिली ‘डिलिव्हरी गर्ल’आहे. ...
ग्रामीण भागातील विकासकामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षातील जवळपास २० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनतिजोरीत परत पाठविण्यात आला आहे. ...
यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ...
दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. ...