तीन दिवसांपूर्वी अकोल्याहून निघालेल्या ९२ वर्षीय कुसुमबाई यांना अखेर बुधवारी अमरावती येथील हमालपुरातील नातवाचे घर मिळाले. रॉयली प्लॉट परिसरातील व्यापारी राजेश गुल्हाने यांनी कुसुमबार्इंना माणुसकीचा आधार देऊन त्या वृद्धेला नातवाच्या घरापर्यंत पोहोचून ...
सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली ...
मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिनाभर उपवास ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. हातून कळत -नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित्त करीत असलेले कैदीदेखील यात मागे राहिले नाहीत, याची प्रचिती येथील मध्यवर्ती कारागृहात ब ...
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले रस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, भुयारी गटार योजना व रिलायन्स यांनी त्यांच्या उपक्रमासाठी फोडलेत. दुरुस्तीचे तीनतेरा झाले असताना, आता शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरातील सात रस्ते २८३० मीटरपर्यंत फो ...
ज्याच्या आगमनासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सूनपूर्व अर्थात वळिवाचा पाऊस तालुक्यात गारपीट घेऊन आला. बुधवारी दुपारी ३.५० वाजता अचानक वारे वाहू लागले. ...
मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन वर्षांपासून भाषा, सामाजिकशास्त्र, गणित व विज्ञान या विषय शिक्षकांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयांच्या सखोल अभ्यासापासून विद्यार्थी वंचित आहेत. सन २०१६ पासून या तिन्ही वि ...
शासनाद्वारे देण्यात आलेल्या ‘विशेष रस्ते विकास अनुदान’च्या निधीत महापालिका क्षेत्रात फक्त बडनेरा मतदारसंघातील कामे घेण्यात आली, तर अमरावती मतदारसंघाला ठेंगा मिळाला. यावर मंगळवारच्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. या कामांची शिफारस करणाऱ्यांची नावे जाहीर ...
महिलांकडून पुरुषांची मसाज होत असल्याच्या प्रकाराचा विरोध करीत युवा स्वाभिमानच्या महिलांनी मंगळवारी नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा पॅलेसच्या फ्रेंचाईजीवर धडक दिली. अंबानगरीच्या संस्कृतीला गालबोट लावणारा हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांन ...