अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत. ...
सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...
परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती. ...
शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत महिन्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान या दोन विभागांच्या अधिष्ठाता पदांसाठी भरती करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने यात आरक्षण रोस्टर प्रणाली लागू केली नाही. ...
स्थानिक मसानगंज परिसरात जुन्या टायरला लागलेल्या आगीने दुकानासह दोन घरांना कवेत घेतले. ही घटना गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास मनपा हिंदी स्कूल-२ नजीक घडली. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली. ...