सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत केवळ अर्धा तास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. पावसानेसुद्धा हजेरी लावली. ...
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत हर्मन फिनोकेम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प लवकरच साकारले जाणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ एकर जागा तत्काळ देण्याचे निर्देश उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. खासदार नव ...
तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधच्या कामातील भ्रष्टाचाराची पोलखोल 'लोकमत'ने केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शाखा अभियंता व पुरवठादार वजा कंत्राटदारांनी आता लपवाछपवी चालवली असून, चौकशीत कामे ...
शनिवारी मृगाचा मुहूर्तावर पावसासह शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावलेल्या वादळाने कहर केला. धामणगाव रेल्वे तालुक्यात शंभर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अमरावतीलाही पावसाने झोडपून काढले. ...
धामोरी-मदलापूरनजीक वादळी पाऊस झाल्याने वादळामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावर धामोरीनजीक आठ ते दहा झाडे मुख्य महामार्गावर कोसळली. यामुळे मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने दोन्ही बाजूला हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत् ...
तारू बांदा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांद्री बाबा मंदिर परिसरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटविण्यास वनविभागाने लादलेली बंदी झुगारून आदिवासींनी तेथे चुली पेटविल्या. शनिवारी मंदिर परिसरातच महाप्रसाद बनविण्यात आला. वनविभागाने आदिवासी बांधवांच्या या चु ...
दहावीच्या निकालात विदर्भात टॉपर असलेल्या मयूर प्रदीप कदम याला आणखी परिश्रम घेऊन आयएएस अधिकारी व्हायचे आहे. जिल्हा बँकेत शिपाई असलेल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांना पंख व आईने उंच भरारीचे बळ दिल्याचे निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले. ...