मेळघाटात तब्बल तीन आठवड्यांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. सलग दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जीवनमान विस्कळीत झाले होते. सततची झड राहिल्याने कपडे धुण्याचा व वाळविण्याची अडचण निर्माण झाली होती. ती शनिवारी-रविवारी दूर झाली. ...
आताची शिक्षण पद्धती ही कारकून शिक्षण पद्धती आहे. यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची गरज आहे. इयत्ता सातव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कॉऊन्सलिंग करून त्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण देणे काळाची गरज आहे. ...
जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. ...
जुन्या वैमनस्यातून चार ते पाच तरुणांनी एका इसमाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचे वार पोटावर बसल्याने जखमी इसमाचे आतील आतडेसुद्धा बाहेर पडले आहेत. उमेश भैय्यालाल कोठारे (४९,रा. लक्ष्मीनगर) असे गंभीर जखमीचे इसमाचे नाव आहे. या हल्ल्या ...
सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली. ...
मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत. ...
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झा ...
महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे. ...