पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी घटनेचे गांभीर्य पाहता प्राथमिक चौकशीनंतर दर्यापूरचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच जमादार सागर नाठे व मंगेश अघडते यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच केले. ...
दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले. ...
शासन निर्णयानुसार विद्यापीठात रस्ते निर्मिती किंवा बांधकाम करायचे असल्यास निविदा प्रक्रिया, एजन्सी नेमण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पार पाडावी लागते. त्यानुसार दीड कोटींतून रस्ते निर्मितीची निविदा पार पडली असली तरी प्रत्यक्षात रस्ते न ...
‘ब्लड मून’, ‘सुपर मून’, ‘ब्ल्यू मून’ ऐकलेले असेलच, आता ‘ब्लॅक मून’ ही संकल्पना समोर आली असून, ३० ऑगस्ट रोजी ही घटना देशवासीयांना अनुभवता येणार आहे. ...
सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून आॅनलाईन सेवेचा प्रारंभ झाला. मात्र, या सेवा केवळ विद्यापीठाच्या संकेत स्थळावर शोभेपुरत्या ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगातून आॅनलाइन सेवेसाठी खर्च झालेले ७२ लाख रुपये वाया तर गेले नाही ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागील काही महिन्यांपासून शाळांच्या जीर्ण इमारत आणि वर्गखोल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिक्षण विभागाकडे प्राधान्याने शाळा दुरुस्तीसाठी ५९५ प्रस्ताव आहेत, तर नवीन वर्गखोल्यांकरिता २४८ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषद आमसभ ...
असंघटित कामगारांमध्ये मोडणाऱ्या बांधकाम तसेच रोजगार हमी योजनेवरील कष्टकऱ्यांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून घेण्यासाठी अमरावती येथे प्रचंड गर्दी होत आहे. ही नोंदणी तालुका स्तरावर करण्याचीदेखील तरतूद शासनाने २ जानेवारी २०१८ रोजी यासंबंधी काढलेल् ...
देशातील सर्वाधिक पटसंख्येची शासकीय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या नगरपालिका शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळेची कामगिरी मांडल्यानंतर अमरावती महापालिकेचे शिक्षक अवाक् झाले. ...
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे. ...