सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ...
सुमारे २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धामणगाव बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...
देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे. ...
पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे. ...