स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांच्यासह भाजपच्या अनिता राज व सोनाली करेसिया, काँग्रेसचे प्रशांत डवरे, शेख जफर व अस्मा फिरोज खान तसेच एमआयएमचे मो. शाबीर मो. नशीर शेख महम्मद व रजिया खातून इक्रामोद्दीन हे सदस्य १ मार्चला स्थायी समितीमधून निवृत्त ...
तीन हजार लोकवस्तीच्या गाव कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे (५२) व त्यांची पत्नी रजनी (४८) यांचा मंगळवारी यवतमाळपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर घाटात अपघातात मृत्यू झाला. दोघेही धामणगावहून यवतमाळला दवाखान्यात जात असताना हा अपघात झाला. राजेंद्र ...
महिलांवरील अत्याचार व एकतर्फी प्रेमातून त्यांना जाळून मारण्याच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. सोबतच समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्यास भाग पाडले पाहिजे, असा ठाम निर् ...
जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास आता ही माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. ...
सभेच्या प्रारंभीच सदस्य शरद मोहोड यांनी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ५९ वसतिगृहांना अनुदान देतांना कोणीही अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नाहीत, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनी सीईओ अमोल येडगे यांन स्वत: भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. ...
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले. ...
शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकड ...
मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा य ...
साहित्य नोंद असणाऱ्या रजिस्टरची तपासणी त्यांनी केली. कॉलवर गाडी गेली असताना सदर ठिकाणचे फोटो काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व वाहनांवर जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले. कॉल फॉरमॅट शासकीय नियमानुसार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्व ...
तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सात दिवसांपासून कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्रीत ओलित करण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली आहे. दिवसभर बिबट्याच्या दहशतीमुळे महिला मजूर शेतात जात नाहीत. या भागात वनविभागाने सोमवारी ...