ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
केंद्र व राज्य सरकारकडून ‘कोरोना विषाणू संसर्ग काळजी करू नका. सावध राहा. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या’ असा संदेश दिला जात आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी अधिक राहत असल्यामुळे काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. कोरोना आजार कशापासून होतो, याचे जा ...
वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनं ...
विद्यमान सभापती बाळासाहेब भुयारसह आठ सदस्यांचा कार्यकाळ १ मार्चला संपुष्टात आला. तत्पूर्वी, २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजप ३, काँग्रेस ३ व एमआयएमच्या २ सदस्यांची निवड करण्यात आली. १६ सदस्यीय स्थायी समितीत नऊ सदस्य असल्याने भाजपचे बहुमत आहे. महापालिके ...
निलंबित करण्यात आल्यानंतर आता अटकेत असलेला दत्तापूर-धामणगावचा तत्कालीन ठाणेदार रवींद्र सोनवणे याला मंगळवारी उशिरा रात्री अमरावती येथून ताब्यात घेतले. मध्यरात्री चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. त्याने तेथे रात्र काढली. कोठडीत रात्र काढ ...
जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणा ...
मजुरी करून कशीबशी आपली उपजीविका व्यतीत करणाऱ्या सोनकली यांनी दोन वर्षांपूर्वी घरगुती वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कालावधीत त्यांच्या घरी वीजपुरवठा होऊन बल्ब लागला नाही. मात्र, महावितरण अधिकारी नित्यनेमाने दरमहा देयक ...
स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दि ...
नळाला विद्युत पंप लावण्यात येत असल्याने बहुतेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक चेतन पवार यांनी महासभा व महापौर बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर आगपाखड केली होती. त्याच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतखाली झाले ...