तांदळाचा ट्रक ज्या गोडाऊनमधून भरला गेला, ते गोडाऊन अमरावती मार्गावरील फौजी ढाब्यालगत आहे. या गोडाऊनमधील तांदळाचा साठा पुरवठा निरीक्षक स्वाती वरूडकर यांनी तपासला. यात गोडाऊनमध्येही त्यांना तांदळाचे पोते (कट्टे) आढळून आलेत. यामुळे पुरवठा विभागाकडून ते ...
जुन्या वस्तीतील पॉझिटिव्ह पती-पत्नीवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच दिवशी ५८ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. मृत महिलेचे पतीवर उपचार सुरु आहे. या दांपत्यांचे दोन मुले काही वर्षांपूर्वी मृत आहेत. सून मुंबईला असल्याने तातडीने येणे शक्य नसल्याने ...
तळेगाव मोहना येथील श्री संत गुणवंतबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, उपविभागीय अधिकाऱ्यांना २४ जूनला पाठविलेल्या पत्रात त्या वधूची जन्मतारीख ७ मे २००३ दाखविली आहे. दाखल्यावरून वधूचे वय केवळ १७ वर्षे ठरत असल्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत चालवलेली लग ...
जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लो ...
छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पास ...
२१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही. ...
राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...
सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन वारीवर काहीशी मर्यादा आली; मात्र महत्त्वाच्या पालख्या योग्य ती दक्षता घेऊन आणण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यात कौंडण्यपूरच्या पालखीचा समावेश आहे. ...
विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेबाबत भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे ‘ट्रायबल’ आयुक्तांनी याबाबत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त अंर्तगत एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहे. ...
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीबी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचा संचार होत असताना त्याला समोरील भागात झाकण नाही, असे चित्र ...