तालुक्यातील महेंद्री, पंढरी, लिंगा वनखंडात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन घडत आहे. अनेकदा वाघाने जनावरांची शिकार केल्याच्या घटना उघड होतात. महेंद्री, पंढरी, शेकदरी या जंगल परिसरात पट्टेदार वाघासह मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशू आहेत. पुसला ...
फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर... ...
आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ...
असदपूर येथे ज्या ठिकाणी युरिया वितरण सुरू होते, तेथे गावातील एक निवृत्त सैनिक हाती विळा घेत दाखल झाला. तो तेथील गोंधळ बघत असताना तैनात पोलिसाने हटकले. यावर त्याने त्या पोलीस शिपायाकडे तो विळा उलटा केला. पोलीस शिपायाच्या कपाळावर तो विळा लागला. या घटने ...
बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वा ...
हनुमाननगर येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वत:च्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, ...
चिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर अ ...