पथ्रोटमध्ये शेती मशागतीला वेग

By Admin | Updated: May 28, 2016 00:11 IST2016-05-28T00:11:45+5:302016-05-28T00:11:45+5:30

हवामानाच्या अंदाजानुसार लवकरच पावसाळ्याला प्रारंभ होणार असल्याने पथ्रोट परिसरात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्णत्वास गेली आहेत.

The pace of farming in Patrot | पथ्रोटमध्ये शेती मशागतीला वेग

पथ्रोटमध्ये शेती मशागतीला वेग

शेतकरी सज्ज : कृषी सेवा केंद्रात खते, बियाण्यांचा साठा
पथ्रोट : हवामानाच्या अंदाजानुसार लवकरच पावसाळ्याला प्रारंभ होणार असल्याने पथ्रोट परिसरात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्णत्वास गेली आहेत. ७ जून ही मृत नक्षत्राची तारीख जवळ आहे. येथील कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी खत व वेगवेगळ्या पिकांच्या बियाण्यांचा साठा जमविला आहे. मात्र दोन वर्षांपासून सततच्या असमानी संकटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी बी-बियाण्यांची भरण (खरेदी) करण्याकरिता बँका सावकाराकडे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
परिसरातील शेती बागायती असल्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांनी प्री-मान्सून कपाशीकरिता आपल्या शेतीची नांगरणी वखरणी करुन तयार केली. २० मे पासून प्री-मान्सून कपासीच्या पेरणीला काही शेतकऱ्यांनी सुरुवातही केली. १० मे पासून या परिसरात शेतकऱ्यांनी हिरव्या वांगीच्या लागवडीला सुरुवात केली आहे. अजूनपर्यंत हिरव्या वांगीच्या लागवडी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी हिरव्या वांगीच्या पेऱ्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कपाशीच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांचा कण कमि असल्याचे दुकानदाराकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे कपाशीच्या हिरव्या वांगीला खर्च खर्च जास्त येतो. तरीही शेतकऱ्यांचा वांगी पिकांकडे जास्तीत जास्त कळ दिसत असल्यामुळे निश्चितच या परिसरात कपाशीचा पेरा कमी राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून हिरवी वांगी या पिकाकडे पाहत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर हिरव्या भाजीपाल्याची आवक कमी होते. त्यामुळे वांग्याचे दर अधिक राहते. त्यामुळे पावसाळ्यात निघणारे वांग्याचे पीक अधिक उत्पन्न देणारे ठरू शकतात. वांगी पिकाचा पैसा ऐनवेळी व रोख मिळत असल्याकारणाने पुढील कास्तकारी करण्याकरीता वेळेवर कामात पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हिरवी वांगी पिकांकडे वाढल्याचे दितस आहे. या परिसरात हिरव्या वांग्याची लागवड अधिक राहण्याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त उष्णतापमानामुळे व दिवसेंदिवस केळीला मिळणारे कमी दर यामुळे शेतकरी हिरव्या वांगीच्या पिकाकडे वळला आहे. (वार्ताहर)

Web Title: The pace of farming in Patrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.