कुऱ्हा येथे ओझोन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:43+5:302021-09-19T04:13:43+5:30
कुऱ्हा : स्थानिक अशोक शिक्षण संस्थाद्वारा संचालित कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल विभाग समिती व राष्ट्रीय हरित सेना ...

कुऱ्हा येथे ओझोन दिन
कुऱ्हा : स्थानिक अशोक शिक्षण संस्थाद्वारा संचालित कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल विभाग समिती व राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने व कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य एस.पी. सामुद्रे यांच्या मार्गदर्शनात ओझोन दिनानिमित्त १६ सप्टेंबर रोजी चित्र व घोषवाक्य प्रदर्शन करण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक अ.वा. इंगळे व ज्येष्ठ शिक्षक जी.पी. मेहेंगे यांनी केले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. याप्रसंगी भूगोल विभाग समितीचे सदस्य म.ह. वाळके, स.प्र. रवाळे, प्र.मो. श्रीखंडे, अ.भी. चांबटकर व कि.ना. ढगे तसेच राष्ट्रीय हरित सेना समितीचे सदस्य सं.र. जिरापुरे, प्र.म. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बारावीच्या विद्यार्थिनी लक्ष्मी राऊत व पायल तायडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.