वरुड ग्रामीण रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:23+5:302021-05-07T04:13:23+5:30
वरूड : स्थानिक आमदार निधीमधून वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. कोविड उपचारासह येथे ...

वरुड ग्रामीण रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन प्लांट
वरूड : स्थानिक आमदार निधीमधून वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. कोविड उपचारासह येथे हॉस्पिटलला लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. पर्यायाने कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.
कोरोनात वाढलेली रुग्णसंख्या व अपुरी यंत्रणा यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी एटीआर इंटरप्राइजेस कंपनीला तात्काळ ऑक्सिजन प्लांट तयार करण्याकरिता कार्यारंभ आदेश देण्यात आला असून ५८ लक्ष ६० हजार रुपयांच्या खचाला ५ मे रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून रोज ४४ सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. आगामी १५ दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल.