जरूडमध्ये साकारणार आॅक्सिजन पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:31+5:302021-01-23T04:13:31+5:30
जरूड : स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जरूड ते मांगरुळी रस्त्याच्या बाजूला ऑक्सिजन पार्क साकारला जाणार ...

जरूडमध्ये साकारणार आॅक्सिजन पार्क
जरूड : स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जरूड ते मांगरुळी रस्त्याच्या बाजूला ऑक्सिजन पार्क साकारला जाणार आहे. त्याअनुषंगाने उपलब्ध जागेवर वृक्षलागवड करण्यात आली तथा पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
निसर्ग आणि पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांनी या अभियानाला मदत करावी, असे आवाहन यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, जरूडचे सरपंच सुधाकर मानकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोपान ढोले, दक्षता समितीचे अध्यक्ष संजय घोरपडे, उपसरपंच शैलेश ठाकरे, पंचायत समिती सदस्य अंजली तुमराम, उत्क्रांतीचे सचिव रामचंद्र पाटील, रामकृष्ण मेश्राम, रामराव वानखेडे, रवि सुरजुसे, विष्णु सलपे, विष्णू राऊत, रवींद्र वसुले, भीमराव हरले, गोविंदराव हरले, शिवाजी वानखेडे, प्राचार्य श्याम जाधव आदी उपस्थित होते.
----------------------