पंगुत्वावर अदम्य इच्छाशक्तीने मात

By Admin | Updated: July 7, 2015 00:18 IST2015-07-07T00:18:32+5:302015-07-07T00:18:32+5:30

जन्मत:च दोन्ही हात नसल्याने जीवनसंघर्ष वाट्याला आला.

Overwhelmed by the indomitable urge on lungs | पंगुत्वावर अदम्य इच्छाशक्तीने मात

पंगुत्वावर अदम्य इच्छाशक्तीने मात

जन्मत:च दोन्ही हात नसल्याने जीवनसंघर्ष वाट्याला आला. परंतु पायात लेखणी धरून शिक्षण पूर्ण केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर आता उच्चशिक्षणाची कासही त्याने धरली आहे. त्यासाठी तो परिसरात शिकवणी वर्ग चालवितो.
बडनेरापासून दोन किलोमीटर अंतरावरील पिंपरी यादगिरे येथील अविनाश हरिचंद्र दाहाट या २१ वर्षीय तरूणाची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. इयत्ता ६ वीपर्यंतचे शिक्षण अमरावतीच्या शाळेत घेतल्यानंतर अविनाशने १२ वीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स आॅफ दी हॅन्डीकॅप’ या संस्थेत घेतले. सध्या तो बी ए. करतो आहे. सोबतच बडनेऱ्यात शिकवणी घेत आहे. उच्चशिक्षण घेण्याची त्याची इच्छा असून त्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी आहे. आर्थिक परिस्थिती जगमतेम असणाऱ्या अविनाशचे वडील फर्निचर दुरूस्तीचे काम करतात. अविनाश एक उत्कृष्ट निवेदकसुद्धा आहे. दोन्ही हात नाहीत म्हणून रडत न बसता अविनाश जिद्दीने परिस्थितीशी झगडत आहे. ज्या वेगाने तो पायाच्या दोन बोटांमध्ये पेन्सिल घेऊन लिहितो ते पाहून अवाक् व्हायला लागते. मोबाईल आणि इतर कामे तो कुणाचाही आधार न घेता करतो.

Web Title: Overwhelmed by the indomitable urge on lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.