शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

महाआघाडी नि भाजपच्या पराभवाला अतिआत्मविश्वास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

अमरावती: ‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपक्षाचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास ...

अमरावती: ‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपक्षाचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना पराभवाच्या मार्गाने नेणारा ठरला.

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. राजकीय वारसा आणि वातावरण लाभलेल्या वाशिम जिल्ह्यातील सरनाईक यांनी निवडणुकीची तयारी शांततेने, परंतु नियोजनबद्धरीत्या केली. मला निवडून देणे तुमच्या कसे हिताचे, हे शिक्षकांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. राज्यातील सत्तापक्षाला आणि विरोधी पक्षाला नेमके तेच जमले नाही.

अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाललेल्या ४० तास अखंडित मतमोजणीदरम्यानचे अनेक क्षण उत्कंठावर्धक ठरले. लढत एकतर्फी कुठल्याही फेरीत नव्हतीच. ती कायम तिरंगी होती. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक, महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष शेखर भोयर हा क्रम सातत्याने कायम राहिला. सरनाईक यांची सुरुवातीला सुमारे एक हजार मतांची आघाडी अखेरपर्यंत धिम्या गतीने दुपटीपार गेली.

अनुदान, पेंशनचा मुद्दा निर्णायक

या निवडणुकीत शिक्षकांचे दोन महत्त्वाचे मुुद्दे चर्चेत आलेत. ज्या शाळांना अनुदान नाही, त्या शाळांतील शिक्षकांना वेतन मिळत नाही. दशक, दोन दशकांहून अधिक काळापासून असे शिक्षक शाळेला अनुदान मिळेल नि आम्हाला वेतन, या आशेवर जगत आहेत. मुलाबाळांसाठी पैसाच नसल्यामुळे काहींनी आत्महत्याही केल्यात. सुमारे चार हजार शिक्षक या विनावेतनाच्या यातना भोगताहेत. श्रीकांत देशपांडे यांची यापूर्वीच्याही सत्तेशी जवळीक असताना त्यांनी हा मुद्दा सोडविला नसल्याच्या कारणाहून शिक्षकांमध्ये नाराजी होती. मतांचा जोगवा मागण्यासाठी देशपांडे यांच्याकडून जाणाऱ्या ‘फोन कॉल्स’ला अनेक शिक्षकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या. त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा सन २००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन बाद केल्याचा. या मुद्याबाबतही शिक्षकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आमदार एकदाच निवडून गेले तरी त्यांना पेन्शन आणि आम्ही शिक्षकी पेशात अख्खी हयात देऊनही म्हातरपणी पेन्शन नाही, हा कसला न्याय? अशा भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत राहिल्या. शिक्षकांच्या या भावनांचा आदर करून संवेदनशीलतेने पुढे जाण्याऐवजी महाआघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, उदय सामंत, वर्षा गायकवाड, बच्चू कडू, रोहित पवार यांच्यासारख्या डझनभर नेत्यांच्या सभांचा सपाटाच लावला. श्रीकांत देशपांडे मानसपुत्र असल्याची शरद पवारांची क्लिपही आणली गेली. देशपांडे यांनी काम केल्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असे सर्वांनीच शिक्षकांना ठासून सांगितले. शिक्षकांच्या मात्र ते गळी उतरले नाही. सत्तेच्या भरवशावर उमेदवार निवडून आणण्याचा अट्टाहास करण्याऐवजी शिक्षकांना चालणारा चेहरा देण्याची नीती महाआघाडीने आखली असती, तर अमरावती शिक्षक मतदारसंघावरही महाआघाडीचाच विजयी झेंडा असता.

भाजप मुख्य लढतीतून बाद

‘आमच्या पक्षाचा अंडरकरंट आहे. लोकांना मोदी आणि देवेंद्र फडणवीस हवे आहेत,’ हा भाजपक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला अतिआत्मविश्वास शिक्षक मतदारांना यावेळी नकोसा झाला. पक्षाला आणि उमेदवारांना अखेरपर्यंत त्याचा अंदाज आलाच नाही. ‘भाजपक्षाचे तिकीट म्हणजे आमदारकीवर शिक्कामोर्तब,’ हे समीकरण आता जुने झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले. अमरावती हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांच्या मामांचा गाव. दोघांनाही अमरावतीची त्यामुळे आपुलकी. अमरावतीकरांनाही दोन्ही नेत्यांचे अप्रूप. असे असले तरी यावेळी शिक्षकांवर त्यांची जादू चालली नाही. भाजपक्षाचे उमेदवार नितीन धांडे मुख्य लढतीतच आले नाहीत. २२ व्या फेरीत ते बादही झाले. अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी अखेरपर्यंत तृतीय स्थान टिकवून ठेवले.

या निवडणुकीत शिक्षकांनी ८९ टक्के असे ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान केले. सत्तापक्ष असो वा विरोधी, कुणाच्याही प्रभावात न येता शिक्षकांनी त्यांचा प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडला - अनुदान आणि पेन्शनसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर तो निडरपणे सभागृहात भांडू शकावा म्हणून!