५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

By Admin | Updated: July 19, 2016 00:15 IST2016-07-19T00:15:51+5:302016-07-19T00:15:51+5:30

जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली.

Over 50 days, 60 revenue deaths, 13 people dead in circles | ५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

अमरावती : जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली. २८ गावांतील ४३५ कुटुंबे बाधित झालीत व १७० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ३०६.५ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६७.५ मिमी पाऊस पडला ही १५२.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला १५२.५ मिमी पाऊस पडला होता. यंदा २० जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. त्यानंतर आठ दिवस पावसाचा खंड होता व २७ जूनपासून पाऊस सुरू झाला ते आतापर्यंत २६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक ११ जुलै रोजी २५ मंडळात अतिवृष्टी झाली.
यंदा २८ जून रोजी डवरगाव ७५ मि.मी., पापळ ७३, वऱ्हा १५५, कुऱ्हा ७२.२. २ जुलै रोजी हिवरखेड ८५, चुर्णी ७४, तिवसा ७२, कुऱ्हा ७२, मोर्शी ८२.३, अंबाडा ७४.२, हिवरखेड ६६.१, ३ जुलै रोजी अंबाडा ७१.६, सातेफळ ६८ व ९ जुलै रोजी वडाळी ६८, माहुली ६९, चांदूररेल्वे ८२.६, आमला ८४.८, घुईखेड १०२, सातेफळ ९६, पळसखेड ६५, धामणगाव १३२.४, अंजनसिंगी ६७, तळेगाव १०२, दत्तापूर ११४.५, मंगरुळ दस्तगीर १०९.४, चिंचोली ९०, भातकुली १०२, वरखेड ७३, वऱ्हा ६५.४, मोझरी ६९.८, लोणी ७२.४, राजुरा ७६.४, चिखलदरा ८५.४, टेंभुरसोडा ७२.४, सेमाडोह १००, चुर्णी महसूल मंडळात ९७.४ मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)

११ जुलैला सर्वाधिक २५ मंडळात अतिवृष्टी
यंदाच्या पावसाळ्यात ११ जुलै रोजी सर्वाधिक २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात वलगाव १०५ मिमी, शिराळा ८५, अचलपूर ९३, परतवाडा १०२, परसापूर ८०.३, रासेगाव ८७, असदपूर ८१.५, पथ्रोट १३१, दर्यापूर ८०.३, येवदा ८३, थिलोरी ८८.१, रामर्थि ८२, सामदा ७९, अंजनगाव ७९, सातेगाव ६५, कापूसतळणी ८४, भंडारज ९०, विहिगाव ७०, कोकर्डा ८५, धारणी ७२, धुळघाट ११३, हरिसाल ७३, सावलीखेडा १०७, चिखलदरा १७२ व सेमाडोह महसूल मंडळात १८३.४ मिमी पाऊस पडला. ं

असे झाले नुकसान
या ५० दिवसात १३ व्यक्ती मृत झाले. यापैकी ८ व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर तीन व्यक्तींचा अंगावर घराची भींत पडल्याने मृत्यू झाला. पावसाने २८ गावातील ४३५ कुटुंब बाधित झाले व १७० व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ११ दुधाळ जनावरे व ९ जनावरे मृत पावली आहे. मृत व्यक्तींच्या वारसाला २८ लाख व जनावरांना २८ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली.

७६२ घरांची पडझड
पावसाच्या ५० दिवसांत ७६२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ११ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाले. १०७ पक्या घरांची अंशत: पडझड, ५२२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. तर ११२ झोपड्या पूर्णत: नष्ट झाल्या आहेत व १० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: Over 50 days, 60 revenue deaths, 13 people dead in circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.