शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 'ट्रायबल'च्या प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे १६ हजारांवर प्रकरणे प्रलंबित; कार्यवाहीला गती देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:16 IST

Amravati : राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे जून २०२५ पर्यंत तब्बल १६,७७३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे जून २०२५ पर्यंत तब्बल १६,७७३ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीविषयक प्रकरणांचा समावेश आहे. विशेषतः किनवट आणि छत्रपती संभाजीनगर येथील समित्यांकडे प्रलंबित प्रकरणांचा मोठा ढीग असून, कामकाजावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत समित्यांना प्रलंबित प्रकरणांवरील कार्यवाही गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत.

नागेश्वर देवीदास धाडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणांमध्ये (रिट याचिका क्रमांक ८३४३/२०२५ व इतर याचिका) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ११ जुलै २०२५ रोजी दिलेल्या आदेशात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले आहे. या विलंबामुळे आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय हक्कांवर परिणाम होत असल्याचा ठपका ठेवत समित्यांच्या कार्यप्रणालीवर न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच, आदिवासी बांधवांना 'कास्ट व्हॅलिडिटी'साठी होणारी हेळसांड तातडीने थांबवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर १३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य सचिवांनी प्रलंबित प्रकरणांचा समितीनिहाय आढावा घेताना प्रलंबित प्रकरणांचा ढीग कमी करण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन' तयार केला, हे विशेष.

कामकाजात तात्पुरता बदल

गोंदिया समितीचे कामकाज नागपूर, गडचिरोलीचे कामकाज चंद्रपूर आणि गोंदिया व गडचिरोली समितीचे उपलब्ध होणारे मनुष्यबळ (समिती कोरम), दक्षता पथकासह तात्पुरत्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर-२, किनवट-२ या समितींकडे वर्ग करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर, किनवट प्रमाणपत्र तपासणी समितीकडे सर्वाधिक प्रकरणे प्रलंबितप्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी २ अतिरिक्त समिती निर्माण करण्याचे निर्देश आहेतपुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली जाईल

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने पारित केलेल्या आदेशाची पूर्तता करण्यास्तव ३ नोव्हेंबर २०२५ रोजीची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेनुसार यापूर्वी राज्यात कार्यरत २ असणाऱ्या १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर-२ व किनवट-२ या समित्यांच्या नव्याने समावेशकरून एकूण १७ समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court Orders Speed Up of Pending Tribal Certificate Cases

Web Summary : The High Court has ordered faster processing of over 16,000 pending tribal certificate verification cases. Delays impact education, jobs, and political rights. Committees are urged to resolve backlogs swiftly, especially in Kinwat and Chhatrapati Sambhajinagar. Action plan initiated to address the issue.
टॅग्स :AmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाCaste certificateजात प्रमाणपत्रHigh Courtउच्च न्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ