‘आऊट सोर्सिंग’ निविदा, तीन कंत्राटदारांत स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:25+5:302021-07-10T04:10:25+5:30

अमरावती : महापालिकेत मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रियेत समितीद्वारा तीन नावे शुक्रवारी फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. ही फाईल ...

‘Outsourcing’ tender, competition between three contractors | ‘आऊट सोर्सिंग’ निविदा, तीन कंत्राटदारांत स्पर्धा

‘आऊट सोर्सिंग’ निविदा, तीन कंत्राटदारांत स्पर्धा

अमरावती : महापालिकेत मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रियेत समितीद्वारा तीन नावे शुक्रवारी फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. ही फाईल सोमवारी आयुक्तांकडे सादर होईल व त्यानंतर स्थायीच्या येत्या बैठकीसमोर हा विषय ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

मनुष्यबळ पुरविण्यासाठी १४ मे रोजी काढलेली निविदा पदाधिकाऱ्यांवरील हस्तक्षेपाच्या आरोपामुळे चर्चेत आली आहे. प्रशासनाच्या प्रक्रियेपूर्वी यात हस्तक्षेप कसा, असा सवाल करीत विरोधी पक्षाने या वादात उडी घेतल्याने प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी यापूर्वीच दिलेली आहे. तांत्रिक व वित्तीय बिड उघडण्यात आल्यानंतर आता एल-१ चा क्रम ठरविण्यात आलेला आहे. यासाठी निवड समितीच्या बैठकीत नियमांची बारकाईने तपासणी करण्यात आली. दरम्यान, अपूर्णांक, स्थानिकांना प्राधान्य आदी नियमांची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे. काही जण यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया होणार असल्याचे भाकीत करीत असल्याने निविदा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

बॉक्स

इकडे आड, तिकडे विहीर

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहिल्याच्या गदारोळामुळे काही अधिकाऱ्यांना आयुक्तांनी खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. पदाधिकाऱ्यांना बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्यांची खप्पामर्जी ओढावून घेणेही परवडणारे नाही. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांची इकडे आड, तर तिकडे विहीर, अशी गत झाल्याची व्यथा एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.

Web Title: ‘Outsourcing’ tender, competition between three contractors