शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये; चंद्रशेखर बावनकुळेंना नवनीत राणांचा टोला

By गणेश वासनिक | Updated: April 9, 2024 21:10 IST

स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध झुगारून नवनीत राणा यांना वरिष्ठ भाजप नेत्यांनी उमेदवारी दिली

अमरावती : माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष असून, त्यांनी कुठे राहायचे याचा निर्णय ते घेतील. मात्र, नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये, असा टोला नवनीत राणा यांनी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर १ एप्रिल रोजी भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक दिवस नवनीत राणा घरात आदेश देतील आणि रवी राणा यांनासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज ना उद्या भाजपमध्ये आणतील, असे म्हटले होते.

स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध झुगारून नवनीत राणा यांना वरिष्ठ भाजप नेत्यांनी उमेदवारी दिली. तेव्हा सगळे आलबेल आहे, असा दावा राणा दाम्पत्याने केला होता. परंतु सगळे सुरळीत सुरू असताना नवनीत राणा यांच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणा यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळवली. रवी राणा युवा स्वाभिमान पक्षात तर नवनीत राणा या भाजपमध्ये आहे, हे विशेष.

मी जीवनात कधीच कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. माझा भाजपला पाठिंबा आहे. नवनीत राणा यांना पाठिंबा आहे. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण ताकदीने नवनीत राणा यांना विजयी करतील. -रवी राणा, आमदार

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४amravati-pcअमरावती