संत्राबागांवर बुरशीपाठोपाठ कोळशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:01:09+5:30

३० वर्षांनंतर या बुरशीजन्य रोगाने डोके वर काढले असून, वरूड, तिवसाघाट, रावळा, शेंदूरजनाघाट आदी गावांमध्ये संत्रापिकावर बुरशीसोबत कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. माधान, ब्राह्मणवाडा थडी परिसरातील बागांवर रोगाची तीव्रता अधिक दिसून येत आहे.

Outbreaks of charcoal followed by fungus on orange orchards | संत्राबागांवर बुरशीपाठोपाठ कोळशीचा प्रादुर्भाव

संत्राबागांवर बुरशीपाठोपाठ कोळशीचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देमार्गदर्शनाची गरज : संततधार पावसाने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : संत्राबागा नेस्तनाबूत करणाऱ्या घातक कोळशी रोगाचा प्रादुर्भाव बागांमध्ये दिसून येत आहे. तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये हा रोग आढळून आला असून, शेतकरी चिंतातुर झाला आहे.
जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता. यात अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड या संत्राउत्पादक तालुक्यातील निम्म्याहून अधिक बागा शेतकऱ्यांना तोडल्या होत्या. राज्याच्या तुलनेत ७५ टक्के संत्राउत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यात होते. त्यातील सर्वाधिक उत्पादन या पाच तालुक्यांत घेण्यात येते. अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड तालुक्यांमध्ये आंबिया बहाराला, तर मोर्शी, वरूड तालुक्यातील काही भागांत मृग बहराला प्राधान्य दिले जाते. बागायती पट्ट्यातील या वरूड तालुक्यात संत्र्यामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे.
दरम्यान, ३० वर्षांनंतर या बुरशीजन्य रोगाने डोके वर काढले असून, वरूड, तिवसाघाट, रावळा, शेंदूरजनाघाट आदी गावांमध्ये संत्रापिकावर बुरशीसोबत कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. माधान, ब्राह्मणवाडा थडी परिसरातील बागांवर रोगाची तीव्रता अधिक दिसून येत आहे. माधान येथील मिलिंद वानखडे, प्रशांत देशमुख, आशिष मोहोड, सतीश मोहोड आदी शेतकºयांच्या बागेत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग संत्राउत्पादक पट्ट्यात पसरल्यास बागांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. 

काय आहे कोळशी : संत्राबागेत काळी माशी पानातील रस शोषण करते. त्याच वेळी माशांच्या शरीरातून चिकट द्रव स्रवतो. पानांच्या मागे, फांद्या-फळांचा पृष्ठभागावर ही बुरशी वाढते. ही बुरशी नखाने खरडल्यास ताण जात असेल, तर ती प्रादुर्भावाची प्राथमिक अवस्था समजली जाते. परंतु, या बुरशीमुळे पूर्ण पान व्यापले किंवा हात लावल्यास बोट काळे होत असल्यास ही प्रादुभार्वाची गंभीर अवस्था मानली जाते. या बुरशीमुळे अन्नद्रव्य निर्माण करण्याची क्षमता क्षीण होत जाऊन फुले, फळधारणेसाठी बागा निष्क्रिय ठरतात. त्यामुळे फवारणी करूनही कीड नियंत्रणात न आल्यास नाइलाजाने बागाच तोडून टाकाव्या लागतात. 

Web Title: Outbreaks of charcoal followed by fungus on orange orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती