नियमबाह्य पार्किंग ‘जैसे थै’
By Admin | Updated: June 30, 2017 00:24 IST2017-06-30T00:24:37+5:302017-06-30T00:24:37+5:30
तहसीलदारांच्या दालनाजवळ नियमबाह्य पार्किंग व्यवस्था गुरूवारी जैसे- थै पहावयास मिळाली. यासंदर्भात "लोकमत"ने

नियमबाह्य पार्किंग ‘जैसे थै’
कारवाई केव्हा ? : तहसीलदारांच्या भूमिकेकडे लक्ष
सचिन मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तहसीलदारांच्या दालनाजवळ नियमबाह्य पार्किंग व्यवस्था गुरूवारी जैसे- थै पहावयास मिळाली. यासंदर्भात "लोकमत"ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करून नियमबाह्य पार्किंग कशी लावली जात आहे. नियमांचे उल्लंघन कसे केले जात आहे. यासंदर्भात प्रश्न लोकदराबारात मांडला होता. अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांविरूद्ध तहसीलदार केव्हा कारवार्इंचा बडगा उगारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन होत आहे. पहिल्या गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर तेथेच पार्किंगकरिता व्यवस्था केलेली आहे. पण तेथे वाहने न ठेवता थेट तहसीलदार अमोल कुंभार यांच्या दालनासमोर वाहने ठेवली जात आहे. काही कर्मचाऱ्यांची वाहने दालनाजवळ ठेवण्याचा प्रकार अनेकदा घडला. काही नेते मंडळी थेट चारचाकी वाहने दुसऱ्या गेटमध्ये आणून उभी करतात. कधीकधी तर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनाही वाहन ठेवण्यास जागा नसते. बाहेरील अधिकाऱ्यांनी जर अचानक दौर केला, तर कसे शिस्तीचे धिंडवडे उडविले जाते. तहसीलदार अमोल कुंभार यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन वाहन चालकांना शिस्त लावावी व ऐकत नसतील तर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.