शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

By गणेश वासनिक | Updated: October 7, 2024 19:52 IST

Chandrakant Patil News: राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मरना यहां’ हे धोरण आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मरना यहां’ हे धोरण आहे. हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात काहीही राग नाही. हर्षवर्धन पाटील यांना भाजपने खूप काही दिले आहे, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली.

मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर आले असता अंबादेवी, एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्याबाबत टीका केली. मंत्री पाटील यांच्या मते, हर्षवर्धन पाटील यांना अमित भाईंनी आणि देवेंद्र फडणविसांनी खूप प्रेम केले आहे. मात्र हर्षवर्धन पाटलांचे दरवेळीप्रमाणे मी, माझ्या लोकांना विचारून निर्णय घेतला, असे म्हणणे योग्य नाही. शेवटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजून सांगत असतो. नेत्यांची व्याख्या हीच जो ‘नेतो’ आणि लीडरची व्याख्या म्हणजे तो ‘लीड’ करतो, असा टोला देखील त्यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते. ...तर औषध द्यायलाही कुणी शिल्लक राहिले नसतेराजकारणातच नाही तर जिवंत माणसाच्या जीवनामध्ये कालचक्रही फिरत असतात. २०१९ ला ही स्थिती आमची होती. हा आला, तो आला, तो आला. भाजपकडे पुष्कळ रांग होती. पण, विश्वासघाताने नंतर आमचे सरकार गेले. सरकार जर गेलं नसतं तर त्यांच्याकडे औषध द्यायलाही शिल्लक कुणी राहिले नसते. सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी झाडून आमच्याकडे आली असती, असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपा