शिक्षकांच्या समस्या सोडविणे आमचे कर्तव्य
By Admin | Updated: April 25, 2017 00:09 IST2017-04-25T00:09:46+5:302017-04-25T00:09:46+5:30
राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ना.गो. गाणार यांनी केले.

शिक्षकांच्या समस्या सोडविणे आमचे कर्तव्य
ना.गो.गाणार : शिक्षक मतदारसंघ आमदारांचा सत्कार
अमरावती : राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ना.गो. गाणार यांनी केले. स्थानिक संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित शिक्षक आमदारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यातील पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातून निर्वाचित झालेल्या आमदारांचा सत्कार येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात पार पडला. शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, कोकणचे बाळाराम पाटील आदींचे सत्कार करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, व्यवसाय शिक्षण सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, उपसंचालक एस.बी.कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव संजय यादगिरे, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, विजुक्टाचे विभागीय अध्यक्ष अविनाश बोंडे उपस्थित होते. यावेळी आ. विक्रम काळे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रास्ताविकातून शेखर भोयर यांनी शिक्षकांच्या समस्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन सोडवाव्यात, अशी मागणी केली. कार्यक्रमाला शिक्षक महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.