- अन्यथा बांधकाम विभागात चिखलफेक करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:01+5:302021-07-10T04:10:01+5:30
फोटो पी ०९ येवदा पान २ ची बॉटम अनंत बोबडे येवदा : दर्यापूर ते अकोट मार्गावरील पुलासह रस्ता रुंदीकरणाचे ...

- अन्यथा बांधकाम विभागात चिखलफेक करू
फोटो पी ०९ येवदा
पान २ ची बॉटम
अनंत बोबडे
येवदा : दर्यापूर ते अकोट मार्गावरील पुलासह रस्ता रुंदीकरणाचे काम काही दिवसांपासून मंदगतीने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, १३ जून रोजी जोरदार पाऊस झाल्यामुळे निनार पुलाच्या बांधकामचे सेंट्रींग मातीसह वाहून गेले. परिणामी पूल खचला. संबंधित कंत्राटदाराचे स्वतःचे होणारे आर्थिक टाळण्यासाठी नाल्यावर मोठ्या प्रमाणात बांध बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या बांधामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात आणि पाण्याने शिरकाव केल्याने शेतजमीन खरडून गेली होती. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी दर्यापूर येथील तहसीलदार योगेश देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांना निवेदन सादर केले होते. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई सरकारकडून किंवा कंत्राटदाराकडून मिळाली नाही. तरीसुध्दा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरडून गेल्याने खराब झालेली जमीन शेतकऱ्यांनी पेरणीकरिता मशागत करून तयार केली. पेरणी करून कसेबसे पीक उभे केले. आज अचानक गुरुवार रोजी पुन्हा नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जलमय झाल्यामुळे इवलेसे पीक वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात झालेल्या शेतकऱ्यांना पीक घेण्यापूर्वीच आर्थिक फटका बसल्यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची तत्काळ पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अन्यथा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालयात चिखलफेक आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने प्रहारच्या प्रदीप वडतकर यांनी दिला आहे. निनार नाल्याला पाणी आल्यामुळे दर्यापूर - आकोट रस्ता चार ते पाच तास बंद होता. याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांची फोनवरून संपर्क साधला असता, तहसीलदार योगेश देशमुख यांनी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून योग्य तो समंस देण्यात येऊन कारवाई करू संबंधित ठेकेदार जैन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संदीप देशमुख यांनी फोन उचलला नाही.