पावसामुळे अंबा एक्स्प्रेससह इतरही रेल्वे गाड्या प्रभावित, प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST2021-07-23T04:10:39+5:302021-07-23T04:10:39+5:30
सततच्या पावसामुळे इगतपुरी ते कसारा घाटादरम्यान एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे बुधवारी रात्री मुंबईहून निघालेली अंबा एक्स्प्रेस कल्याण रेल्वे ...

पावसामुळे अंबा एक्स्प्रेससह इतरही रेल्वे गाड्या प्रभावित, प्रवाशांना मनस्ताप
सततच्या पावसामुळे इगतपुरी ते कसारा घाटादरम्यान एका ठिकाणी दरड कोसळल्यामुळे बुधवारी रात्री मुंबईहून निघालेली अंबा एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकानजीक थांबविण्यात आली. सर्वच प्रवाशांचे तिकीट रद्द करण्यात आले. ही गाडी दुसऱ्या दिवशी अमरावतीसाठी रिकामी रवाना झाली. त्याचप्रमाणे हावडा -मुंबई सुरत मार्गाने वळविण्यात आली. गुरुवारी अंबा एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. नागपूरहून मुंबईसाठी गेलेली दुरंतो एक्स्प्रेस भुसावळ येथून परत आली. त्याचप्रमाणे नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक येथे थांबली होती. रेल्वे रूट सुरळीत करण्यात आल्याने काही गाड्यांची ये-जा सुरू झाल्याचे रेल्वे सूत्रांकडून समजते. सततच्या पावसाचा फटका रेल्वे गाड्यांसह प्रवाशांनादेखील बसला आहे. लवकरच सर्वच रेल्वे गाड्या या मार्गाने सुरळीतपणे धावू लागतील, असे सांगण्यात आले.