-अन् कर्मचाऱ्यांनी हाती घेतले गुलेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:57+5:30

दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे पळविले जात आहेत.

-The other staff was taken by Gullar | -अन् कर्मचाऱ्यांनी हाती घेतले गुलेर

-अन् कर्मचाऱ्यांनी हाती घेतले गुलेर

googlenewsNext

नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या कार्यालयात कर्मचारी जेवण करीत असताना त्यांचे डबे लाल माकडांनी पळवून नेले. सोमवारी दुपारी २ नंतर हा प्रकार घडला. त्यामुळे जेवण अर्धवट सोडून कर्मचाऱ्यांना हाती गुलेर घ्यावी लागली. हातचा पेन सोडून कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ गुलेर घ्यावी लागली असताना माकडांचा बंदोबस्त करण्यात स्थानिक नगरपालिका प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे. गत आठवड्यात माकडाने एका कर्मचाऱ्याला चावा घेतला.
चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटो भागात जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे कार्यालय आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे लंच टाइममध्ये जेवणाचे डबे उघडून स्थापत्य अभियंता दिलीप ढोकणे, शिपाई भक्ती, चालक वासुदेव भक्ते व इतर कर्मचारी बसले असता, माकडांनी अचानक कार्यालयात धाव घेऊन जेवणाचे डबे पळवून नेले. गत आठवड्यात मंगळवारी माकडांनी परिचर मंगेश गावले यांना चावा घेत जखमी केले होते. वरिष्ठ सहायक पंकज गुल्हाने, कनिष्ठ सहाय्यक ईश्वर राठोड यांना दररोज माकडे हाकलण्याचे कार्य करावे लागत आहे.
दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे पळविले जात आहेत. त्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वी, प्राणहानी टाळण्यासाठी माकडांना प्रतिबंध घालणे निकडीचे झाले आहे.

कागदी खानापूर्ती
माकडांच्या बंदोबस्त करण्यासंदर्भात चिखलदऱ्याचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर व वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र मुगल यांना पूर्वीच निवेदन देण्यात आले. त्यावर आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला, असे ठेवणीतील उत्तर मिळत असल्याने संतापात भर पडली आहे.

परिसरात माकडांनी हैदोस घातला आहे. कार्यालयात येऊन चावा घेणे, डबे पळविण्याचे प्रकार होत असल्याने कर्मचारी दहशतीखाली आहेत. वनविभागाने माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा.
- पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना

Web Title: -The other staff was taken by Gullar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड