मालमत्ता कर वगळता अन्य करमाफी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:24+5:302021-03-19T04:12:24+5:30
वरूड : कोरोना काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. परंतु, नगरपरिषदेने मालमत्ता, पाणीपट्टी कराची वसुली सुरू केल्यामुळे मालमत्ता ...

मालमत्ता कर वगळता अन्य करमाफी हवी
वरूड : कोरोना काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. परंतु, नगरपरिषदेने मालमत्ता, पाणीपट्टी कराची वसुली सुरू केल्यामुळे मालमत्ता कराव्यतिरिक्त अन्य सर्व कर पालिकेने माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
मालमत्ता कर घेण्यात यावा. पाणीपट्टी, दिवाबत्ती, वृक्ष, साफसफाई व इतर कर १० दिवसाच्या आत माफ करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा सुशील बेले, अशोक गडलिंग, श्रावण शियाले, पुंडलिक देशभ्रतार, जाफर खा पठाण, तालुका प्रसिद्धीप्रमुख अमर हरले, प्रदीप दुपारे, संदीप बेहरे, नीलेश अधव, गौतम अधव, आशिष लांडगे, गणपत धुर्वे, मोहमद अब्रार, रोशन गाठे, अरविंद गाडगे, अनिकेत रामटेके यांनी दिला आहे.
-----------