शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत अनाथ मुलीवर लष्कराच्या जवानाकडून बलात्कार, खल्लार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 17:01 IST

बरेली येथे तैनात असलेल्या आणि भांबोरा येथील मूळ रहिवासी लष्करातील जवानाविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारपीडित १६ वर्षांची अल्पवयीन युवती असून, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनगाव सुर्जी  (अमरावती) : बरेली येथे तैनात असलेल्या आणि भांबोरा येथील मूळ रहिवासी लष्करातील जवानाविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारपीडित १६ वर्षांची अल्पवयीन युवती असून, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गजानन बबनराव रिठे (२६, रा. भांबोरा) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील बरेली येथे तैनात आहे. तो जून २०१७ मध्ये आपल्या घरी सुटीवर आला होता. त्याच गावातील अल्पवयीन युवतीच्या घरात शिरून त्याने पिण्यास पाणी मागितले आणि घरात कोणी नसल्याचे पाहून शारीरिक अत्याचार केले. पुन्हा दोन-तीन दिवसांनी तिच्या घरात प्रवेश करून त्याने आपली वासना शमविली. या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास समाजात तुझी बदनामी करेन व जिवे मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. आजोबांकडे असलेल्या अल्पवयीन युवतीचे पोट काही दिवसांपासून दुखत असल्याने तिला एका खासगी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. तिच्या आजोबांना हा मोठा धक्का होता. अखेर त्या मुलीला बालकल्याण समितीच्या आधारे बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. त्यानंतर महिला-बाल कल्याण समितीने या घटनेची दखल घेऊन खल्लार पोलीस ठाण्याला पत्र देऊन आरोपीवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल चौधरी यांच्या तक्रारीवरून गजानन रिठे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३७६, पोस्को ६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार शुभांगी आगाशे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल चौधरी, महिंद्र साखरे, राजेंद्र व्यवहारे, संतोष राठोड करीत आहेत.

मुलगी आली होती आजोबांकडे आश्रयालाअल्पवयीन युवतीचे आई-वडील वारल्यामुळे ती आजोबांकडे आश्रयाला आली होती. या अगतिकतेचा फायदा गजाननने उठविला आणि बदनामीच्या भीतीपोटी ती गप्प राहिली.  

 तपास पथक तयार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केले जाईल.- शुभांगी आगाशे, ठाणेदार, खल्लार

टॅग्स :AmravatiअमरावतीCrimeगुन्हा