चांदूर रेल्वे येथे कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST2021-04-08T04:12:50+5:302021-04-08T04:12:50+5:30

तालुक्यातील तसेच चांदूर रेल्वे शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता चांदूर रेल्वे येथे प्रभागनिहाय कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात ...

Organizing Corona Vaccination Camps at Chandur Railway | चांदूर रेल्वे येथे कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन

चांदूर रेल्वे येथे कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन

तालुक्यातील तसेच चांदूर रेल्वे शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता चांदूर रेल्वे येथे प्रभागनिहाय कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन नगर परिषद मुख्यधिकारी मेघना वासनकर यांनी केले. पंडित जवाहरलाल नेहरू शाळा येथे ८ एप्रिल रोजी, जिल्हा परिषद शाळेत ९ एप्रिल रोजी तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र कोवे यांनी सांगितले. याशिवाय कोविड टेस्टिंग शिबिराचे सकाळी ८ ते १२ या वेळेत इंदिरानगर येथे ८ एप्रिल रोजी व भगवंत चौक येथे १० एप्रिल रोजी आयोजन करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी मरसकोल्हे यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ ते १२ या वेळेत टेस्टिंग कॅप दररोज राहील, असे सांगण्यात आले.

Web Title: Organizing Corona Vaccination Camps at Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.