आयोजक-डीजे मालकाची डीसीपी करणार चौकशी

By Admin | Updated: September 8, 2015 00:04 IST2015-09-08T00:04:15+5:302015-09-08T00:04:15+5:30

दहीहंडी स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहीहंडी आयोजक व डीजे संचालकांना ...

Organizer-DJ owner's DCP inquiry | आयोजक-डीजे मालकाची डीसीपी करणार चौकशी

आयोजक-डीजे मालकाची डीसीपी करणार चौकशी

दहीहंडी प्रकरण : चौकशीसाठी एकसदस्यीय समिती
अमरावती : दहीहंडी स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहीहंडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस आयुक्तांसमोर हजेरी लाऊन स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती तयार करण्यात आली असून ही समिती घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईची दिशा ठरविली जाईल.
रविवारी शहरात तीन ठिकाणी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी पोलिसांनी आयोजक व डीजे संचालकांना काही सूचना दिल्या होत्या. डीजेचा आवाज ७५ डेसिबलच्यावर ठेवल्यास ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, राजापेठ, राजकमल व जयस्तंभ या तिन्ही ठिकाणी डीजेची तपासणी केल्यानंतर आवाज ९० डेसिबल पेक्षा अधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याची नोंद पोलिसांनी घेतली असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांमार्फत संबधीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी ध्वनीप्रदूषणाचे प्रकरण पोलीस उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर पोलीस आयुक्तांसमोर सुनावणी होईल.

दहीहंडीच्या तिन्ही कार्यक्रमामध्ये ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन झाल्याचे तपासणीनंतर लक्षात येत आहे. याबाबत कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये समिती नेमण्यात आली आहे. चौकशीअंती ते पुढील कारवाईची दिशा ठरवतील.
- राजकुमार व्हटकर,
पोलीस आयुक्त.

Web Title: Organizer-DJ owner's DCP inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.