अवयवदान जागृती महाफेरी आज
By Admin | Updated: August 30, 2016 00:02 IST2016-08-30T00:02:10+5:302016-08-30T00:02:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत.

अवयवदान जागृती महाफेरी आज
महाअवयवदान अभियान : पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत. त्यांनी ‘तेन भुंजिभा’ म्हणजेच ‘त्याग करण्यात उत्तम आनंद’ या शब्दांत अवयवदानाचे महत्त्व सांगितले आहे. याच अनुषंगाने शहरात मंगळवार ३० आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अवयवदान महाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत अवयवदान महाअभियान ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले जाईल.
या महाफेरीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे.
१ सप्टेंबरपर्यंत अभियान
अमरावती : या फेरीनिमित्ताने विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनासह सामाजिक संघटना आयएमए फॉक्सी, बालरोग तज्ज्ञ संघटना, शल्यचिकित्सक संगठना, ईएनटी संगठना, शहरातील डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हास्तरीय अवयवदान अभियान समितीचे सदस्य सचिव अरूण राऊत यांनी केले आहे.