‘त्या’ वसतिगृहासाठी नवीन इमारत शोधण्याचे आदेश
By Admin | Updated: June 30, 2015 00:16 IST2015-06-30T00:16:36+5:302015-06-30T00:16:36+5:30
येथील राठीनगरस्थित एका संकुलात सुरु असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह हे नियमबाह्य असल्यामुळे

‘त्या’ वसतिगृहासाठी नवीन इमारत शोधण्याचे आदेश
अमरावती : येथील राठीनगरस्थित एका संकुलात सुरु असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह हे नियमबाह्य असल्यामुळे या वसतिगृहासाठी नवीन इमारत शोधण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदिवासी मुलींच्या शैक्षणिक व्यवस्थेत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. यात सुधारणा झाली नाही तर कठोर कारवाई होईल, अशा आशयाचे पत्र गृहपालांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाठविले आहे.
२८ जून रोजी ‘लोकमत’मध्ये ‘आदिवासी मुलींच्या वसतिगृहाखालीच बीअर शॉपी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करुन आदिवासी विकास विभागात सुरु असलेल्या अफलातून कारभाराची लक्तरे उघडकीस आणली गेली. या वसतिगृहावर आदिवासी विकास विभागाचे धारणी येथील प्रकल्प अधिकारी रमेश मवासी यांचे नियंत्रण आहे.