३७ लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:32+5:30

नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन यांना दिले आहेत.

Order for deduction of salary of 37 late employees | ३७ लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीचे आदेश

३७ लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीचे आदेश

Next
ठळक मुद्देझेडपी अध्यक्षांची भेट : नांदगाव पंचायत समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन यांना दिले आहेत.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची आणि जाण्याची शासनाने वेळ निश्चित केलेली असताना दांडी मारून आपल्या सोयीने कार्यालय गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांची झेडपी अध्यक्षांनी पोलखोल केली आहे. अध्यक्षांच्या आकस्मिक भेटीत नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीत अनुउपस्थितीत आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी १,विस्तार अधिकारी सांख्यिकी १, विस्तार अधिकारी पंचायत, शिक्षण २,कनिष्ठ अभियंता बांधकाम १,स्थापत्य अभियंता १,पशुधन पर्यवेक्षक १,वरिष्ठ सहायक २,कनिष्ठ सहायक ६, ग्रामसेवक १,परिचर १,एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयातील २,गट साधन केंद्र ४,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ३,मग्रारोहयो कार्यालयात ९ असे एकूण ३७ कर्मचारी आकस्मिक भेटीत कार्यालयात अनुउपस्थित आढळून आले आहेत.

नांदगाव पंचायत समितीला सकाळी अचानक भेट दिली असता ३७ कर्मचारी गैरहजर होते.या सर्व कर्मचाºयांच्या वेतन कपातीने आदेश डेप्युटी सीईओंना दिले आहेत.याबाबतच्या कार्यवाहीचा अहवालही मागविला आहे.
- बबलू देशमुख
अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Order for deduction of salary of 37 late employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.