एसटी महामंडळात ५० टक्के उपस्थितीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:19+5:302021-03-21T04:13:19+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्याचे आदेश दिले आहेत .एसटीच्या विभागीय ...

एसटी महामंडळात ५० टक्के उपस्थितीचे आदेश
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्याचे आदेश दिले आहेत .एसटीच्या विभागीय कार्यशाळेचा प्रवासी वाहतुकीची थेट संबंध येतो. त्यामुळे चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी तसेच सर्व अधिकारी व पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना वगळून प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याची सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. तातडीचे व महत्त्वाचे काम सुरू राहण्यासाठी संबंधित खाते विभाग घटक प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखाली चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी अधिकारी व पर्यवेक्षक पदावर कर्मचाऱ्यांना वगळून प्रशासकीय कर्मचाऱ्याना रोज कार्यालयात न बोलावता त्यांना आळीपाळीने बुडवावे व त्यानुसार कामाचे नियोजन करावे. कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के राहील. याची दक्षता घेण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत हे नियम लागू राहणार आहे.