सैनिकाला वाचवण्याच्या प्रयत्नात संत्री जखमी फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:38+5:302020-12-27T04:10:38+5:30

अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिकाला, वाचवितांना ड्युटीवर तैनात संत्रीसुद्धा जखमी झाला. भाजल्या गेला. पिंपळखुटा येथील ...

Orange wounded photo in an attempt to save the soldier | सैनिकाला वाचवण्याच्या प्रयत्नात संत्री जखमी फोटो

सैनिकाला वाचवण्याच्या प्रयत्नात संत्री जखमी फोटो

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिकाला, वाचवितांना ड्युटीवर तैनात संत्रीसुद्धा जखमी झाला. भाजल्या गेला.

पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हिमाचल प्रदेशातील कुलुमनाली क्षेत्रात देशाच्या सीमेवर कर्तव्यावर हजर होता. घटनेच्या दिवशी रात्रीला त्याची ड्यूटी उशिरा असल्यामुळे टेन्टमध्ये रॉकेल हिटर लावून, तो स्लिपींगबेडमध्ये झोपी गेला. दरम्यान एक सैनिक टेन्टबाहेर आपल्या पॉइन्टवर ड्यूटी करीत होता. सीमेवर पहारा देत होता. यातच त्या टेन्टला आग लागली. आगित क्षणातच होत्याचे नव्हते झाले. झोपी गेलेल्या सैनिक कैलासला त्या स्लिपींगबेडमधून बाहेरही पडता आले नाही. त्या स्लिपींगबेडसह तो जळून ठार झाला. या दरम्यान ड्यूटीवरील त्या सैनिकाने संत्री कैलासला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याला वाचवू शकला नाही आणि स्वत:ही भाजल्या गेला.

या दुर्देवी घटनेनंतर कैलासचे पार्थिव शनिवार, २६ डिसेंबरला शिमला-चंदिगडहून दिल्ली विमानतळावर दाखल झाले. तेथुन रविवार, २७ डिसेंबरला सकाळच्या विमानाने ते पार्थिव सकाळी ९ वाजतापर्यंत नागपूर विमानतळावर सुभेदारांसमवेत पोहचणार आहे. पूर्वतयारी म्हणून हवालदार नागपूरला दाखल झाले आहेत.

पुलगाव मिल्ट्री कॅम्पमधील सैनिकांचे एक दल ते पार्थिव स्वीकारून सन्मानपूर्वक वाहनाने अमरावती व अमरावतीवरून अचलपूर-परताडा-धामणगाव गढी देवगावमार्गे पिंपळखुट्यात दाखल होणार आहे. सैनिकाचे पार्थिव ज्या मार्गे पोहचणार त्या मार्गावरील परतवाडा, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी आणि पिंपळखुट्यापर्यंत गावागावांत श्रद्धांजलीपर फ्लेक्स लागले आहेत.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावकरी व मित्रमंडळींनी पिंपळखुटा गाव झाडून स्वच्छ केले आहे. शासकीय इतमामातील अंत्यसंस्काराच्या स्थळापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडांना पांढरा चुना मारण्यात आला आहे.

अंत्यसंस्कार दरम्यान पुलगाव सैनिक छावणीतील सैनिकगार्ड सैन्य दलाच्यावतीने तर पोलीस पथक शासनाच्यावतीने मानवंदना देणार आहेत.

अचलपूर एसीडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, परतवाडा ठाणेदार प्रदीप चौंगावकर, आमदार राजकुमार पटेल यांनी पिंपळखुट्यात पोहचून केल्या गेलेलेल्या तयारीची शनिवारी पाहणी केली.

बॉक्स

संवाद अखेरचा ठरला

घटनेच्या काही तास आधी बुधवारी सकाळी कैलासने आई आणि वडिलांसोबत फोनवरून संवाद साधला. गावाकडची व घरची कुशलता विचारली. काही पैसे खात्यात टाकत असल्याचे वडिलांना, तर ड्यूटीवरून परतल्यानंतर गुुरुवारी सविस्तर बोलणार असल्याचे आईला सुचविले. बुधवारच्या या संवादानंतर गुरुवारी पहाटे कैलासचा मृत्यू झाल्याची वार्ताच त्यांना समजली. बुधवारचा आपल्या कुटुंबीयांसमवेतचा कैलासचा संवाद अखेरचा ठरला.

Web Title: Orange wounded photo in an attempt to save the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.