शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकाची तंत्रज्ञानाअभावी पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:54 PM

विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड-मोर्शी तालुक्यात प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादक माघारला आहे.

ठळक मुद्देसर्व प्रयत्न अयशस्वीवातावरणाचा बदल, पाण्याचे दुर्भिक्ष्य बागायतदारांच्या मुळावर

वीरेंद्रकुमार जोगीआॅनलाईन लोकमतअमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड-मोर्शी तालुक्यात प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादक माघारला आहे. साठवणूक करण्याकरिता शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यानंतरही संत्रा उत्पादकांना पीक फायदेशीर ठरत नाही.अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या एकूण लागवडीपैकी सर्वाधिक क्षेत्र वरूड-मोर्शी तालुक्यात आहे. सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. एकट्या वरूड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. त्यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळ देणारी झाडे आहे. यामुळे उत्पादनसुद्धा मोठया प्रमाणात होते. संत्रा उत्पादकांसमोर वातावरणबदलामुळे येणारे रोग व पाण्याचे दुर्भिक्ष्य ही सर्वांत मोठी समस्या आहे.उत्पादकांनी मुलांप्रमाणे संत्राबागांची जोपासना केली. नवनवे प्रयोग करून बागा जगविल्या. मात्र, तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादकांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उत्पादक दुसऱ्या पिकाकडे वळतील, असे मत व्यक्त होत आहे.प्रयत्न पडले अपुरेसन १९४५ पासून संत्र्याची लागवड सुरू झाली. १९६० साली शेंदूरजनाघाट येथे अमरावती जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक सहकारी संस्थेच्या प्रकल्पाची कोनशिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी रोवली. पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी झाली. १९९२ साली वरूडमध्ये ‘सोपॅक’ फॅक्टरी लागली, तर १९९५ साली मोर्शी तालुक्यात मायवाडी यथे ‘नोगा’ प्रकल्प उभारला. हे दोन्ही प्रकल्प बंद पडले.व्यापाऱ्यांची मक्तेदारी कायमदेशी-परदेशी बाजारपेठांमध्ये संत्र्याला मागणी मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यामुळे संपूर्ण देशातून व्यापारी येथे ठाण मांडून संत्राबागा खरेदी करतात. बागायतदारांकडे पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. यामध्ये नवा पर्याय उभा राहिल्याशिवाय यात फारसा बदल होणार नाही, असे मत बागायतदार व्यक्त करीत आहेत.नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याऐवजी अस्तित्वात असलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. त्याद्वारे उत्पादकांना तात्काळ दिलासा देता येईल.- हर्षवर्धन देशमुखमाजी कृषिमंत्री तथा संत्रा उत्पादक

संत्री तोडल्यानंतर अल्पावधीत विल्हेवाट लावावी लागते. त्याचा फायदा घेत भावात व्यापारी उत्पादकांना भाव देत नाहीत. उत्पादकांसाठी शीतगृहाची गरज आहे.- प्रमोद कोहळेसंत्रा उत्पादक व जाणकार

टॅग्स :Farmerशेतकरी