यावर्षी संत्री तोडणी करणाऱ्या मजुरांना मात्र सुगीचे दिवस आहेत. तोडणीची ४०० ते ५०० रुपये दिवसाची मजुरी असून, डवारी करणाऱ्या मजुरांना ३०० रुपये मजुरी आहे. या मजुरांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज रोजगार मिळत आहे, तर संत्राउत्पादक शेतकरी पूर्णपणे निराश झाला आहेत. बारा महिन्यांपासून एकवेळ येणाऱ्या पिकानेही दगा दिला. निसर्गाशी सामना करून पीक तयार करायचे. मात्र, त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. काही शेतकरी हे पाच रुपये किलोच्या दराने किंवा १०० रुपये कॅरेट दराने संत्र्याची विक्री करण्यास तयार आहेत. तरीही व्यापारी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. कधीकाळी याच संत्र्याला ७० ते ८० रुपये किलो किंवा १४०० रुपये कॅरेट दर राहिला असल्याची आठवण शेतकऱ्यांना कासावीस करीत आहे.
संत्री तोडणीमधून मजुरांना रोजगार मिळाला, मात्र शेतकरी मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST