नुकसानभरपाईसाठी संत्राउत्पादकाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:48+5:302021-03-17T04:13:48+5:30

धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा मोबदला अद्यापही न मिळाल्याने ...

Orange grower's fast for compensation | नुकसानभरपाईसाठी संत्राउत्पादकाचे उपोषण

नुकसानभरपाईसाठी संत्राउत्पादकाचे उपोषण

धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा मोबदला अद्यापही न मिळाल्याने मिर्झापूर येथील रूपराव मांडवगणे या शेतकऱ्याने सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण थाटले.

मिझार्पूर येथे रहिवासी विमल रूपराव मांडवगणे यांचे शेत शहापूर गट क्रमांक २८/२ मध्ये आहे. त्यांच्या शेतात संत्र्याची मोठी झाडे आहेत. मात्र, या शेताच्या बाजूला लागून रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने स्टोन क्रशर, सिमेंट प्लांट, डब्ल्यूएमएम असा प्लांट टाकला. त्यामुळे संत्राबागेचे अतोनात नुकसान होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे मांडवगडे यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन सिंघवी, पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी दुधे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे चेतन परडके, पंकज वानखडे, अविनाश दुधे यांनी येथे भेट दिली.

Web Title: Orange grower's fast for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.