कॅशलेस व्यवहारामुळे संत्रा मातीमोल !
By Admin | Updated: March 11, 2017 00:04 IST2017-03-11T00:04:25+5:302017-03-11T00:04:46+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

कॅशलेस व्यवहारामुळे संत्रा मातीमोल !
धनादेश अनादरीत : संत्रा उत्पादकावर आर्थिक संकट
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आंबिया बहाराला नोटाबंदीचा फटक ा बसल्यावर आता मृगाचा बहार देखील ‘कॅ शलेस’च्या विळख्यात सापडला असून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. दरम्यान संत्र्याचे भाव कमी होत चाल्याने संत्रा उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे.
वरूड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर बागायती क्षेत्रात संत्र्याची लागवड करण्यात आली. यापैकी २१ हजार हेक्टरमध्ये फळबागा आहेत.
शेतकरी झिजवताहेत उंबरठे
वरूड : वर्षातून दोनदा येणाऱ्या संत्र्याला सुरूवातीला नोटबंदी व आता कॅशलेस व्यवहाराचा फटका बसला आहे. आंबिया बहराला पाहिजे तशी किंमत मिळाली नसल्याने मृगबहराच्या संत्र्यातून तूट भरून काढता येईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला होता. व्यापाऱ्यांना संत्राबागा खरेदी केल्यावर त्याबदल्यात धनादेश दिले होते.
बँकांमध्ये ‘कॅश’ नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना धनादेशाच्या बदल्यात पैसे मिळू शकत नसल्याचे चित्र आहे. शिवाय व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे नसल्यामुळे त्यांनी दिलेले धनादेश अनादरित होत आहेत. यामुळे पैशासाठी शेतकरी मंडईचे दरवाजे झिजवित असल्याचे चित्र आहे. सरकारच्या ‘कॅशलेस’ व्यवहाराचा फटका शेतकऱ्यांना बसला. विवाहसोहळे, धान्य खरेदी, दवाखान्याचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
संत्र्याचा भाव झाला कमी
आंबिया बहार आला असताना नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नव्हता. मृगबहारातील संत्र्याला चांगला भाव मिळतो, याआशेने अनेक व्यापाऱ्यांनी ा बागा जपल्या व चांगले उत्पादन घतले. कॅशने व्यवहार व्हावा असे वाटत असल्याने अनेकांनी धनादेश स्वीकारले नाहीत. आता ‘कॅशलेस’च्या फटक्यामुळे संत्र्याचे भाव कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.