आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना चार जिल्ह्यांतून ३० शाळांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:11+5:302021-04-12T04:12:11+5:30

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा ...

Option of 30 schools from four districts for teachers for inter-district transfer | आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना चार जिल्ह्यांतून ३० शाळांचा पर्याय

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना चार जिल्ह्यांतून ३० शाळांचा पर्याय

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा आणि २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येईल. बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाईन अर्जऐवजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, गटशिक्षणाधिकारी संबंधित अर्ज ऑनलाइन सादर करतील. दरवर्षी ३१ मे पर्यंतच बदल्या केल्या जाणार आहेत.

काही वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बराच गोंधळ होत आहे. या पार्श्वभूमीवर बदल्यांचे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नव्या धोरणातही शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्यासाठी आधीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु आंतरजिल्हा बदलीसाठी सध्याच्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र एनओसी आवश्यक असल्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्या बाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठीचे सात निकष ठरविण्यात आले आहेत. त्यातील निकषांची पूर्तता करणारे क्षेत्र अवघड मानले जाईल. जिल्हाअंतर्गत बदल्या यासाठीही संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देण्यात येईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेले शिक्षक बदली पात्र असतील सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष सेवा आणि एका शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र मानले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

०००००००००००

. नवीन बदली धोरणात काय?

- पूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी एकाच जिल्ह्याचा पर्याय देण्यात येत होता. आता चार जिल्ह्यांचा पर्याय देता येतील

- जिल्हांतर्गत बदलीसाठी आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येईल

- वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या पती-पत्नीला आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याचा करायचा असल्यास दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल.

- पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास आणि त्यांना तिसऱ्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास दोघांपैकी कनिष्ठ असलेल्यांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाईल

--------------

यांना दिले जाणार प्राधान्य

- ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांना संवर्ग १ मधील कर्मचाऱ्यांना

- ज्या संवर्गातून निवड झाली त्याच संवर्गातील रिक्त पदावर दुसऱ्या जिल्ह्यात बदली.

- पती-पत्नी एकत्रीकरणाचा प्राधान्यक्रमही नव्या धोरणात निश्चित.

- पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असल्या प्रथम प्राधान्य.

------------

हे असेल पात्र शिक्षक

- अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असलेले शिक्षक

- सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एकाच शाळेवर पाच वर्षात सेवा केलेले शिक्षक

- आंतरजिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क असणार नाही

- आंतरजिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क असणार नाही

Web Title: Option of 30 schools from four districts for teachers for inter-district transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.