बँकेच्या खासगीकरणास वरूडमध्ये विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:35+5:302021-03-18T04:13:35+5:30
--------- नांदगाव खंडेश्वर येथे युवकाला मारहाण नांदगाव खंडेश्वर : वडिलांना मारहाण झाल्याने त्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या पवन प्रकाश इखार ...

बँकेच्या खासगीकरणास वरूडमध्ये विरोध
---------
नांदगाव खंडेश्वर येथे युवकाला मारहाण
नांदगाव खंडेश्वर : वडिलांना मारहाण झाल्याने त्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या पवन प्रकाश इखार (२३, रा. इंदिरानगर) याला अतुल पंजाबराव दुधे (३३) लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच चावा घेतला. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांत त्यापूर्वी पवन इखार व प्रकाश इखार (४७) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली. पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून दोघांनी मारहाण केली व चावा घेतल्याची तक्रार अतुल दुधे यांनी दाखल केली.
---------------
जळगाव आर्वी येथे आजपासून
संत लहरी बाबा पुण्यतिथी महोत्सव
धामणगाव रेल्वे : विदर्भातील हजारो भाविकांचे हृदयस्थान असलेले संत लहरीबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात व घरोघरी कलशाची स्थापना होईल. रात्रीला भाविक घरीच संत लहरीबाबा यांची आरती करतील.
----------
माहुली जहागीर येथे युवकाला मारहाण
नेरपिंगळाई : घरापुढे मद्यपान करीत असलेल्या इसमाला हटकले म्हणून त्याने युवकाला मारहाण डोक्यावर काठी मारून जखमी केले. माहुली जहागीर पोलिसांनी जखमीच्या पत्नीच्या तक्रारीवरून दीपक किसनराव काळपांडे (४०) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
जावरा मोळवण येथून मोबाईल लंपास
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जावरा मोळवण येथे घरात टेबलवर ठेवलेला साडेसात हजारांचा स्मार्ट फोन लंपास करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अमोल साहेबराव ठाकरे (४५ यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
झापल येथे महिलेचा विनयभंग
धारणी : घरात शिरून लपून बसलेल्या अनिल जयराम कोल्हसकर (२०) याने वीज गूल होताच अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची तक्रार २५ वर्षीय विवाहितेने केली. तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-------