तपोवन वसतिगृहातील प्रकार आधीच झाला असता उघड
By Admin | Updated: December 24, 2014 22:52 IST2014-12-24T22:52:30+5:302014-12-24T22:52:30+5:30
तपोवन वसतिगृहातील दोन मुलींवरील बलात्काराच्या घटनेने शहराची प्रतिमा डागाळली. पूर्वीपासूनच हा प्रकार सुरु होता. परंतु व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार उघडकीस येऊ शकला नाही.

तपोवन वसतिगृहातील प्रकार आधीच झाला असता उघड
अमरावती : तपोवन वसतिगृहातील दोन मुलींवरील बलात्काराच्या घटनेने शहराची प्रतिमा डागाळली. पूर्वीपासूनच हा प्रकार सुरु होता. परंतु व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार उघडकीस येऊ शकला नाही. या वसतिगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची चौकशी व्हावी, असे पत्र हव्याप्र मंडळाच्या चाईल्ड लाइनने बालकल्याण समितीला दिले होते.
मात्र चौकशी का झाली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तपोवनच्या वसतिगृहात १२२ मुले-मुली वास्तव्यास आहेत. अनाथ मुला-मुलींच्या संगोपनात व्यवस्थापनाने हयगय केली, हे वास्तव आहे. एकीकडे शासनाकडून अनाथ व निराधारांच्या संगोपनासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना सोयी-सुविधा पुरुविण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही त्यांच्यावर अन्याय होतो. दीड वर्षात चाईल्ड लाइनने २० अनाथ मुला-मुलींना तपोवनच्या वसतिगृहात आसरा दिला आहे.