दुर्बिणीतून शनीची सुप्रसिद्ध रिंग पाहण्याची संधी
By Admin | Updated: May 22, 2015 00:35 IST2015-05-22T00:35:52+5:302015-05-22T00:35:52+5:30
सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह हा २३ मे रोजी पृथ्वीच्याजवळ राहील.

दुर्बिणीतून शनीची सुप्रसिद्ध रिंग पाहण्याची संधी
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह हा २३ मे रोजी पृथ्वीच्याजवळ राहील. त्यामुळे या दिवशी शनीची सुप्रसिद्ध रिंग दुर्बिणीतून सहज दिसू शकेल. साध्या डोळ्यांनी शनीची रिंग दिसू शकत नाही. २३ मे रोजी हा ग्रह सायंकाळी ७ च्या सुमारास पूर्वेकडे उगवेल व पहाटे ५ वाजता पश्चिमेकडे मावळेल.
याआधी शनी १० मे २०१४ रोजी पृथ्वीच्या जवळ आला होता. या ग्रहाला एकूण ६१ चंद्र आहे. सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. शनीची रिंग ही बर्फ व धुळीचे कण याची बनलेली आहे. ही रिंग सुमारे २ लाख ७० हजार किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे.
या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
ज्या खगोलप्रेमींना २३ मे रोजी ३ इंच व्यासाच्या टेलीस्कोपमधून शनीची रिंग अवलोकन करायची असल्यास खगोल अभ्यास विजय म. गिरूळकर याच्या निवासस्थानी विनामूल्य पाहता येणार आहे.
सर्व खगोलप्रेमींनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)