शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

‘ऑपरेशन गोल्ड’; 10 किलो सोन्याचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

आपली श्रीजी गोल्ड कंपनी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या व्यवहाराच्या अधिकृत पावत्या त्याच्याकडे नव्हत्या. चार वर्षांपासून मुंबईहून सोने आणून त्याबाबतचा व्यवहार या सदनिकेतून करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे बिल, कारागिराला दिलेले सोने व एकूणच व्यवहाराचा अधिकृत दस्तावेज आरोपींकडे नसल्याने ते सर्व सोने जप्त करण्यात आले. आता त्याबाबत तपास करण्याची परवानगी राजापेठ पोलीस न्यायालयाला मागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ पोलिसांनी दसरा मैैदानासमोरील एका सदनिकेतून तब्बल ५ कोटी रुपयांच्या सोन्यासह ५ लाख ३९ हजार रुपये रोख पकडली. ताब्यात घेतलेले दोघेही त्याबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ शकले नाहीत. पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळविले असून, रविवारी रात्री १० वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चालली. त्या जप्त सोन्याचा ‘कच्चा चिठ्ठा’देखील पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक माहितीनुसार, कर चुकविण्यासाठी त्या सोन्याचा कच्च्या चिठ्ठीद्वारे व्यवहार होत होता. आपण ते सोने मुंबईच्या सराफा मार्केटमधून आणून, त्याचे स्थानिक कारागिरांकडून दागिने करवून घेत, ते येथील सराफा व्यावसायिकांना विकत असल्याची माहिती राजेंद्रसिंह राव याने दिली. आपली श्रीजी गोल्ड कंपनी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या व्यवहाराच्या अधिकृत पावत्या त्याच्याकडे नव्हत्या. चार वर्षांपासून मुंबईहून सोने आणून त्याबाबतचा व्यवहार या सदनिकेतून करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे बिल, कारागिराला दिलेले सोने व एकूणच व्यवहाराचा अधिकृत दस्तावेज आरोपींकडे नसल्याने ते सर्व सोने जप्त करण्यात आले. आता त्याबाबत तपास करण्याची परवानगी राजापेठ पोलीस न्यायालयाला मागणार आहेत. हा हवालाचादेखील व्यवहार असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.  कारवाईसाठी राजापेठ पोलीस पहाटे ५ पर्यंत जागले. ते १० किलो सोने एका लोखंडी पेटीत ठेवून ती पेटी मालखान्यात सुरक्षित ठेवण्यात आली. त्यात चार बॉक्समध्ये आढळलेल्या कच्च्या चिठ्ठ्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत.यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त भारत गायकवाड  यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे ठाणेदार  मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक  सुरेंद्र अहेरकर,  उपनिरीक्षक किसन मापारी, डीबी स्कॉडमधील सागर सरदार, छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने,  दिनेश भिसे, विकास गुडधे, नरेश मोहरील, पवन घोम, दिनेश आखरे, वकील शेख, राजू लांजेवार, मंगेश शिंदे, सुनील विधाते, राजेश गुरेले, चालक नीलेश पोकळे, सुनील ढवळे, साधना इंगोले यांनी केली.

पुढे काय? : याबाबत रविवारी रात्रीच आयकर विभागाच्या येथील सहायक संचालकांसह नागपूरचे आयकर सहआयुक्त अमोल खैरनार यांना माहिती देण्यात आली. जीएसटी व अन्य करांची चुकवेगिरी करण्यासाठी सुवर्णदागिन्यांचा बेहिशेबी साठा करण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती आयकर विभागाला देण्यात आली. याबाबत न्यायालयात तपासाची परवानगी मिळाल्यानंतर त्या सोन्याच्या दागिन्यांचे वास्तव उघड होईल. ज्या सुवर्णकारांना दागिने विकत असल्याचा दावा करण्यात आला, ते सुवर्णकारदेखील चौकशीच्या टप्प्यात येतील. 

जप्त दागिन्यात काय?दोन आरोपींकडून एकूण १० किलो २३८ ग्रॅम व ९०० मिली सोने जप्त करण्यात आले. त्यात सुमारे ५८० ग्रॅमची बिस्किटे, तर ९ किलो ६०० ग्रॅमहून अधिक वजनाचे सोन्याचे हार, कर्णफुले, अंगठ्या, चेन, चपलाहार, ब्रेसलेट आदी दागिने आहेत. 

तूर्तास दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त सोने व रकमेबाबत आयकर विभागाच्या वरिष्ठांना कळविले. तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊ. जप्त मुद्देमालाबाबत आरोपींकडे वस्तुनिष्ठ माहिती, दस्तावेज आढळून आले नाहीत.मनीष ठाकरे,ठाणेदार, राजापेठ  

 

टॅग्स :GoldसोनंPoliceपोलिस