महापालिका कर्मचार्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By Admin | Updated: June 9, 2014 23:22 IST2014-06-09T23:22:09+5:302014-06-09T23:22:09+5:30
शासन महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करण्याच्या विचाराधीन असून हा निर्णय कर्मचारी व शहर विकासाच्या हिताविरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचार्यांनी काळी फित

महापालिका कर्मचार्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
अमरावती: शासन महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करण्याच्या विचाराधीन असून हा निर्णय कर्मचारी व शहर विकासाच्या हिताविरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचार्यांनी काळी फित लावून कामकाज केले. एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाने महापालिकेतील उत्पन्नाचे स्त्रोत व कर्मचार्यांच्या वेतनाची हमी घ्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
महापालिका कर्मचारी संघाचे प्रल्हाद कोतवाल, मंगेश वाटाणे, मानविराज दंदे, गणेश तंबोले आदींच्या नेतृत्वात काळी फीत लावून शासन निर्णयाविरूध्द हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी महापालिकेत जकात कर लागू करण्यात आला होता. मात्र शासनाने १ जुलै २0१२ पासून जकात कर हटवून त्याऐवजी एलबीटी सुरू केला. वर्षभराचा कालावधी सुरळीत जात नाही तेच एलबीटी बंद करण्याच्या घडामोडी शासनाने सुरू केल्या आहेत. हा निर्णय शासनाने व्यवसायिकांच्या हितासाठी घेण्याचे ठरविले असले तरी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी महापालिकेच्या उत्पन्नाची साधने आणि कर्मचार्यांच्या वेतनाची हमी शासनाने घ्यावी, अशी न्यायीक मागणी कर्मचार्यांची आहे. कर्मचार्यांच्या या मागणीला अधिकारीवंृदानेही जोरकसपणे पाठिंबा दर्शविला. अधिकार्यांनीसुध्दा काळी फित लावून कामकाज केले. महापालिकेत सर्वच विभागात कर्मचार्यांनी काळी फीत लावून कामकाज केल्याचे निर्दशनास आले.