तळणीत भरली खुली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:42+5:302021-06-11T04:09:42+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना आज तळणी ग्रामपंचायतीने शिवराज्यभिषेक दिनानिमित्त पुढाकार घेत ...

तळणीत भरली खुली शाळा
धामणगाव रेल्वे : कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना आज तळणी ग्रामपंचायतीने शिवराज्यभिषेक दिनानिमित्त पुढाकार घेत प्रत्येक चौकात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत खुला अभ्यासक्रम जाहीर केला आहे. धामणगाव तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येची असलेले तळणी गाव हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय भैसे यांच्या नावाने ओळखली जाते येथील उपसरपंच विशाल भैसे या गावात विविध उपक्रम राबवित आहे. कोरोना काळात आपल्या गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना हे खुले शिक्षण मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी गावात खुली शाळा सुरू केली आहे. प्रत्येक चौकात इयत्ता बालवाडी तसेच पहिली ते चौथीपर्यंत अभ्यासक्रमाचे चार्ट लावले आहे. या चार्टचे उद्घाटन सरपंच प्रीती पचारे, उपसरपंच विशाल भैसे, ग्राम सचिव सुधीर चौधरी, ग्राप सदस्य सुधाकर लकडे, अविनाश धुर्वे, सुवर्णा कोल्हे, माधुरी जानोस्कर शाळेचे मुख्याध्यापक सुनील रोंघे, गुल्हाने, काकडे, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ताभाऊ कोल्हे, विजय येलेकर, अक्षय येलेकर यांची उपस्थिती होती.