नायलॉन मांजाची खुलेआम विक्री
By Admin | Updated: January 15, 2017 00:06 IST2017-01-15T00:06:06+5:302017-01-15T00:06:06+5:30
सर्वीच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजा विक्रीवर निर्बंध घातले आहे. तरही शहरात खुलेआम या मांजाची विक्री होतांना निदर्शनास आले आहे .

नायलॉन मांजाची खुलेआम विक्री
लहानग्यांचा जीव धोक्यात : बंदी असतानाही वापर कसा ?
संदीप मानकर अमरावती
सर्वीच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजा विक्रीवर निर्बंध घातले आहे. तरही शहरात खुलेआम या मांजाची विक्री होतांना निदर्शनास आले आहे .यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना होत असेल तर पोलीसांनी कारवार्इंचा बडगा का उगारु नये,असा प्रश्न विचारला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नायलॉनच्या घातक मांजा उत्पादन व विक्रीवर निर्बध घातले आहेत. अलीकडे या घातक मांजाने लहान मुलांचा गळा चिरल्याच्या घटना उघड झाल्यात. परंतु अंबानगरीत मकरसंक्रातीनिमित्त अनेक हौसी तरुणांना पतंग उडविण्याचा मोह आवरत नाही. नमुना, खापर्डे बगीचा ,जवाहर गेट, गांधी चौक, ईतवारा व शहरातील अनेक पतंग विक्रेत्यांक डे नायलॉनचा मांजा विक्रीस उपलब्ध आहे. २० ते ८० रुपयांमध्ये हा मांजा मिळतो. लहान मुलेही पतंग उडवितात. एखादी पतंग कटली की, तिच्या मागे मुले धावतात. हा धागा अत्यंत धारदार असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नॉयलान मांज्यामुळे अनेकांचे हात कापल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही राजरोसपणे हा मांजा वापरल्या जातो.
पोलिसांनी कारवाई करावी
नायलॉन मांजा विक्र ीवर न्यायालयाने निर्बंध घातले असतानाही शहरात मांजा विक्री करण्याच्या गोरखधंदा फोफावला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अशा दुकानांवर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे. थोडासा नफा मिळविण्यासाठी पतंग व मांजा विक्रेते हा व्यवसाय करतात. मात्र त्यांच्या नफेखोरीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.पोलिसांनी कारवाई करणे अभिप्रेत आहे.
प्रशांतनगरमध्ये मुलांजवळ आढळला मांजा
मकरसंक्रातीला पतंगोत्सवाला उधान येते. काही वर्षापुर्वीसाधा मांजा विक्रीस होता.मात्र आता चायनामेड नायलॉन मांजा प्राधान्याने विकला जातो.शनिवारी प्रशांतनगर परिसरात एका लहान मुलाकडे नायलॉनचा मांजा आढळून आला. त्याला विचारणा केली असता, तो मांजा नमुना गल्लीतून विकत आणल्याचे त्याने सांगितले. पतंग विक्रेत्यांचे शहरात व जिल्हयात शेकडो दुकाने आहेत.